Monday , February 6 2023

अनाधिकृत फेरीवाल्यांना हटवा, भाजपच्या कृष्णा गिरी यांची मनपाकडे मागणी

नवी मुंबई : अशोक शेषवरे

ऐरोली सेक्टर तीनमध्ये रस्त्याच्या कडेला सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत भाजी विक्रेते व्यवसाय करतात. याचा परिणाम महानगरपालिकेने निर्माण केलेल्या मंडईमध्ये व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांवर होत आहे. म्हणून  अनधिकृत भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी ऐरोली मंडळ भाजप युवा मोर्चाचे सचिव कृष्णा गिरी यांनी ऐरोली विभाग अधिकार्‍याकडे निवेदन देऊन केली आहे.

ऐरोली सेक्टर तीनमध्ये पदपथ, पार्किंग, मोकळी जागा आदी ठिकाणी कुणाचीही भीती न बाळगता अनधिकृत फेरीवाले आपला व्यवसाय करत आहे. त्यांच्यावर कुणाचाही प्रतिबंध नसल्याने अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस फोफावत चालला आहे.त्याचाच परिणाम पार्किंगमध्ये व्यवसाय करत असल्याने वाहन रस्त्यावर लगत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.तर पदपथावर व्यवसाय करत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून जावे व यावे लागत आहे. त्यामुळे अपघाताच्याही घटना घडत असल्याचे भाजप युवा सचिव गिरी यांनी सांगितले. या अनाधिकृत फेरीवाल्यांचा फटका मनपाचे अधिकृत परवाना धारक याना बसला आहे. परवानाधारक फेरीवाल्यासाठी मनपाने एक मंडई निर्माण केली आहे. परंतु रस्त्यावर बसणार्‍या फेरीवल्याकडून ग्राहक भाजी किंवा इतर साहित्य खरेदी करत असल्याने ग्राहक मंडईमध्ये जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे परवानाधारक व्यवसायिकाचा आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात दररोज होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ऐरोली विभाग कार्यालयाचे अतिक्रमण अधिकारी राकेश निमेश यांनी , आम्ही अनाधिकृत फेरीवालल्यावर नियमित कारवाई करतो. तसेच पुन्हा कारवाई

करू असे सांगितले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply