पनवेल : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ब मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत रूचिता लोंढे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आरपीआयच्यावतीने लोंढेंचा महापालिकेत सोमवारी सत्कार करण्यात आला. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नितीन पाटील, अमर पाटील, आरपीआयचे शहर अध्यक्ष किशोर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील, तालुका उपाध्यक्ष गौतम पाटेकर, वाकडी मोरबे अध्यक्ष प्रविण गायकवाड, असिफ कुरेशी, पोशिराम टेंभे, सुभाष टेंभे, गौतम धोंडसेकर, मयुरेश नेटकर आदी उपस्थित होते.