Breaking News

बोरघाटात रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

अपघातविरहित प्रवासासाठी जनजागृती होणार

खोपोली : प्रतिनिधी

राज्यात 11 ते 17 जानेवारी हा आठवडा रस्ते सुरक्षा अभियान म्हणून साजरा होत आहे. अपघातांचे केंद्र बनलेल्या मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाट पोलीस केंद्रातही मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व पटवून देत वाहतूक नियमांचे धडे दिले. तसेच या  सात दिवसांत जनजागृतीसाठी बोरघाट पोलीसांकडून राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. रासपचे माजी जिल्हाध्यक्ष बबन शेडगे, खोपोलीचे नगरसेवक राजू गायकवाड, आत्करगाव ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शेडगे, मनसे खोपोली शहराध्यक्ष अनिल मिंडे, नितीन सुतक, एकनाथ घाटे, रमाकांत सुतक, आरिफ शेख, साजिद मालदार, ग्रीन फिल्ड कंपनीचे अनिल सकपाळ, जय मल्हार सेक्युरिटीचे प्रशांत पाटील, ज्येष्ठ नागरिक श्रीधर दळवी यांच्यासह महामार्ग व खंडाळा घाट वाहतूक पोलीस आणि वाहन चालक उपस्थित होते. रस्ते सुरक्षा सप्ताहात खंडाळा घाट व महामार्ग वाहतूक पोलिसांकडून विशेष अभियान सुरू असून,  त्यात वाहनांची तांत्रिक तपासणी, चालकांत जनजागृती, वाहतूक नियमांची अंमलबजावणी आदी मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी माउंट अलटेरिया-हिरानंदानी कंपनीकडून विशेष  सहकार्य मिळणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply