Monday , January 30 2023
Breaking News

आयएएस ऑफिसर ट्रेनींची जेएनपीटीला भेट

उरण : रामप्रहर वृत्त

जेएनपीटी बंदरावरील सुविधांची पाहणी करण्यासाठी लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनीस्ट्रेशनच्या 2019 बॅचच्या आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थींनी जेएनपीटीला भेट दिली. आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांना जवाहरलाल नेहरू बंदरावरील कामाची तसेच त्यांच्या अर्थकारण, समाजातील भूमिकांची माहिती मिळावी हा या भेटीमागचा उद्देश होता. जेएनपीटी हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर पोर्ट असून, राज्य आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासातील सर्वांत मोठा महत्त्वाचा असा योगदानकर्ता आहे. आयएएस अधिकार्‍यांना बंदरावर चालणार्‍या इत्थंभूत कामाचा अनुभव, जेएनपीसीटी व बीएमसीटीपीएलसारख्या टर्मिनलच्या व्यापाराचे प्रमाण समजून घेणे व बंदराच्या वतीने घेण्यात येणारे इतर उपक्रम जाणून घेण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. या वेळी जेएनपीटीचे एकंदर कामकाज, पायाभूत विकासावर सविस्तर सादरीकरण जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी उपस्थितांसमोर केले. दरम्यान, या भेटीत जेएनपीटीचे अध्यक्ष आयएएस संजय सेठी यांनी संवादात्मक सत्र घेऊन त्यात देशाच्या आर्थिक परिघात जेएनपीटीची भूमिका आणि वैश्विक बाजारपेठांमधील जेएनपीटीचे योगदान विषद केले. बंदराची स्थिर वृद्धी, कामकाजाची कार्यक्षमता व एदखच् समुदायासाठी व्यापार स्थिर, कार्यक्षम, किफायतशीर आणि सुलभ होण्यासाठी राबविण्यात येणारे विविध चरण अधोरेखित करण्यात आले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply