Breaking News

सुडकोली अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंगप्रकरणी फरार मुख्याध्यापकाला अटक

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील सुडकोली हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुडकोली येथील सूर्योदय हायस्कूलचा मुख्याध्यापक सुदाम हाशा वाघमारे याने 22 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन विद्यार्थिनीस तिच्या मैत्रिणींसमोर अश्लील शब्द वापरून लज्जीत केले तसेच तिच्या शरीराशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडितेने आईवडिलांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली.

मुलीची बेईज्जती होईल या भीतीने सुरुवातीस ते शांत राहिले. दरम्यान, घडल्या घटनेपासून मुख्याध्यापक हायस्कूलमध्ये आलाच नाही. या प्रकाराची चर्चा गावात होऊ लागली. शेवटी पीडित मुलीची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानुसार मुख्याध्यापक सुदाम हाशा वाघमारे याच्या विरोधात भादंवि कलम 354 (अ), 294सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण व 2012चे कलम 3 (क) 9 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी फरार मुख्याध्यापक सुदाम वाघमारे याला अटक केली. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर करीत आहेत.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply