रेवदंडा : प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा 19 वा वर्धापनदिन नुकताच रेवदंड्यातील काशिनाथ बनिया विरगुंळा उद्यानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष सुभाष चिटणीस यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्य व स्मार्ट कार्डची माहिती दिली. रेवदंडा अर्बन बँकेचे चेअरमन वामन घरत यांनी बँकेतर्फे ज्येष्ठांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, संघाचे सचिव आत्माराम आपटे यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. प्रमुख अतिथी परहुर वृध्दाश्रमाचे संस्थापक अॅड. गुंजाळ, सुरेश पाटील, डॉ. सुरेश गोरेगांवकर, डॉ. विजय वरसोलकर, डॉ. अमर पाटील, नागाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जोशी, दिपक मोकल, सदाशिव मोरे, बाळकृष्ण पवार, भवरलाल जैन, विठ्ठल म्हात्रे, शंकर भगत, पांडुरंग नााखवा, सुलोचना भाटे, बळीराम बंगळेकर, मालतीताई ठाकूर, रामचंद्र म्हात्रे, रविंद्र सुर्वे, निर्मला सोमण, सुलोचना साखणकर, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाच्या उपाध्यक्षा सरोज वरसोलकर, लता चिटणीस, देवधर आदींनी विशेष परिश्रम घेतले.