Breaking News

शहराचा विकास साधताना नियोजन गरजेचे

आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन

पेण : प्रतिनिधी

शहराचा विकास साधताना नियोजन गरजेचे असून यातूनच विकासनिधीचा उपयोग चांगल्याप्रकारे होऊ शकतो, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे केले. पेण नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घनकचरा हाताळणी तंत्रज्ञान प्रकल्पाचे भूमिपुजन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास उपनगराध्यक्षा वैशाली कडु, गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, नगरसेवक दिपक गुरव, दर्शन बाफना, तेजस्विनी नेने, प्रशांत ओक, देवता साकोस्कर, अर्पिता कुंभार, भाजप शहराध्यक्ष हिमांशु कोठारी, माजी सभापती प्रकाश पाटील, भाजप उपाध्यक्ष अजय क्षिरसागर, प्रशासकीय अधिकारी राजाराम नरुटे, आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण, अंकिता इसळ, आरोग्य समन्वयक विशाल सपकाळ, प्रकल्पाचे प्रमुख समीर प्रभुघोट, मोहन घाडगे, मिलिंद म्हात्रे, महेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना रविशेठ पाटील यांनी सांगितले कि, अनेक विकासकामे करण्यासाठी विकास निधी येत असतो, परंतू या विकासनिधीचा उपयोग करण्यासाठी नियोजन करणेही गरजेचे आहे. पेण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व त्याच्या सहकार्‍यांनी तसेच मुख्याधिकारी यांच्या समन्वयाने शहरात विविध विकासकामे मार्गी लागत असून या घनकचरा प्रकल्पासाठी मुंबई येथील त्रिरत्न प्रेरणा मंडळाने पुढाकार घेऊन एक चांगले पाऊल उचलले आहे. यासाठी पेण नगरपररिषदेची निवड केल्याबद्दल धन्यवाद दिले.

शहराचा एकप्रकारे चेहरा मोहरा बदलण्याचे काम होत आहे. या प्रकल्पातून  घनकचरा  व्यवस्थापनेत सुधारणा करून नगरपालिकेने संधीचे सोने करावे तसेच हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी जनतेनेही सहकार्य करावे.

-आमदार रविशेठ पाटील

घनकचरा प्रकल्प हा पेण नगरपरिषद एक स्तुत्य उपक्रम राबवित आहे. तसेच हा उपक्रम नागरिकांसाठी गरजेचा आहे. यासाठी स्वच्छ, सुंदर पेण ही संकल्पना अमलात आणावी.

-प्रितम पाटील, नगराध्यक्षा, पेण नगरपरिषद

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply