Sunday , February 5 2023
Breaking News

फुटपाथ, ड्रेनेज, मलनि:स्सारण लाईन दुरुस्त करा

तेजस कांडपिळे यांची सिडकोकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल प्रभाग 20मधील फुटपाथ, ड्रेनेज लाइन आणि मलनि:स्सारण लाइन दुरुस्तीसाठी प्रभाग ’ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. नवीन पनवेलमधील प्रभाग 20, सेक्टर 16 पिल्लेज कॉलेजच्या हॉस्टेल रस्त्यावरील  मलनि:स्सारण लाइन सतत चॉकअप होऊन भरल्यामुळे रस्त्यावर घाण पसरून परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गणीपार्क बिल्डिंगसमोरील फुटपाथ खराब झाले असून, तेथील गटारावरील झाकणेही तुटली आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुले पडून अपघात होण्याची शक्यता आहे. मालखंड सोसायटीसमोरील रस्त्यावर असलेले गटार आणि मलनि:स्सारण लाइन एकत्र झाल्याने त्या ठिकाणी गॅस तयार होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्याचा रहिवाशांना त्रास होतो. यासाठी प्रभाग 20चे नगरसेवक आणि प्रभाग ’ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे नुकतेच पत्र देऊन प्रभाग 20 मधील फुटपाथ, ड्रेनेज लाईन आणि मलनि:स्सारण  लाईन दुरुस्त करून देण्याची मागणी केली आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply