पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका भरती 2020 या नावाने अनेक बेरोजगारांना ऑनलाईन पोर्टल वर नियमित भरती असल्याची जाहिरात सध्या दिसत आहे. परंतु ही नियमित भरती नसून विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त वरिष्ठ अथवा कनिष्ठ लिपिक हवेत त्यांच्यासाठी ही भरती असल्याचा खुलासा महापालिकेने केला आहे. पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी ही भरती नसून विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त वरिष्ठ अथवा कनिष्ठ लिपिक हवेत. पनवेल महानगरपालिका अंतर्गत मालमत्ता कर विभागात मनुष्यबळ नसल्याने सेवानिवृत्त अनुभवी कनिष्ठ-वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण 15 जागा मानधनावर भरण्यासाठी पात्र असणार्या सेवानिवृत्त कर्मचा-यांकडून अर्ज मागविण्यात आले असल्याचे सांगून. इच्छुक आणि पात्र फक्त सेवानिवृत्त कर्मचार्यांनीच पुढील पदासाठी सेवानिवृत्त कनिष्ठ-वरिष्ठ लिपिकपद संख्या 15 जागा शैक्षणिक पात्रता- उमेदवार बारावी उतीर्ण किंवा पदवीधर मानधन – रु. 20,000 पात्रताधारकांनी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे मुलाखतीकरिता शुक्रवारी (दि. 17) हजर रहावे असे आवाहन केले आहे. अधिक माहिती करिता प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात वाचावी. नवीन उमेदवारांनी येऊ नये. फक्त सेवानिवृत्त कर्मचारी व जे पात्र आहेत त्यांनीच यावे. ही नविन भरती नाही. अद्याप आकृतीबंध मंजूर नसल्याने सेवानिवृत्त लोकांची गरज आहे. फक्त सेवानिवृत्त हवेत हे जाहिरातीत स्पष्ट नमूद केले असल्याने गैरसोय झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.