Breaking News

एकता पुरस्कार व सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

मुंबई : प्रतिनिधी

एकता कल्चरल अकादमीचा 31वा एकता पुरस्कार व  सांस्कृतिक महोत्सवाचा सांगता समारंभ नुकताच मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे झाला. या समारंभात नाटककार प्रेमानंद गज्वी, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार भरतकूमार राऊत याच्या हस्ते एकता पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रेमा किरण यांना ’एकता कला गौरव पुरस्कार’, संपदा जोगळेकर कुळकर्णी-अभिनय, सुनीता डागा-अनुवादित साहित्यिक, विलास गावडे, शुभांगी सावंत-दृष्यसंकलन, दुर्गेश सोनार -पत्रकारिता, हरेश साठे, सतीश पाटील- संगीत, डॉ.उषा राव- शैक्षणिक, अ‍ॅड. अर्चना गायकवाड-न्याय-विधी, सुनयना गोसावी-कला, डॉ. माधुरी वाघचौरे-शिक्षण, शारीरिक, क्रीडा, संकेत खर्डीकर-तरुण प्रेरक वक्ता, समाजसेवेचे सर्वश्री पुरस्कार अनंत जाधव, किरण बढे, संतोष धोत्रे, डॉ. गिरीश लटके, अशोक कांबळे अशा विविध क्षेत्रामधील अठरा व्यक्तींना एकता पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकताचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले, तर सूत्रसंचलन प्रा. अवधूत भिसे यांनी केले. अभिनेते प्रमोद पवार, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, आशिष घोडके यांना देखील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी केले. माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, अशोक कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, समन्वयक गंगाधर म्हात्रे, श्वेता जाधव यांच्यासह गौरी कदम, चित्रा पाटील, अमित जाधव, राजेश जाधव, दिनेश मोरे, प्रियंका जाधव, शाश्वती कांबळे, दीपक आरोंदकर, नीता आरोंदकर, प्रचिती पाटील, यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply