Breaking News

बँकेत रक्कम भरण्यासाठी गेलेल्या महिलेला गंडा; खोपोलीतील घटना

खोपोली : प्रतिनिधी

सेंट्रल बँकेच्या खोपोली शाखेत रक्कम भरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर पाळत ठेवून तिच्या कडील रक्कम चलाखीने लंपास करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सदर महिलेने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुलोचना तुळशीराम साळुंखे (रा. शेमडी, ता. खालापूर) यांनी घराच्या बाधकामासाठी आपल्या जावई यांच्याकडून दीड लाख रुपये उसने घेतले. ती रक्कम खोपोली येथील सेंट्रल बँकेमध्ये जमा करण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी येथे बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी या महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेतला. या दोघांनी सदर महिलेला पैसे मोजण्यासाठी मदत करण्याचा आव आणत त्यांच्याकडील पैसे घेतले व हातचलाखीने त्यातील दोन हजाराच्या 18 नोटा काढून घेतल्या. सुलोचना यांना एकूण 36 हजाराला गंडवून त्या दोघांनी काही क्षणांतच बँकेतून पलायन केले. सुलोचना यांनी बँकेच्या कॅशियरकडे पैसे दिल्यानंतर 18 नोटा कमी असल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या सुलोचना  साळुंखे यांनी तत्काळ झालेला प्रकार खोपोली पोलिसांत येऊन सांगितला. पोलिसांनी प्राथमिक तपास म्हणून बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली मात्र या चोरट्यांनी डोक्यावर टोप्या घातल्या असल्याने त्यांचा चेहरा सीसीटीव्ही स्पष्टपणे दिसत नसल्याने, अज्ञात व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हैसचोर त्रिकुटाला पोलीस कोठडी

मुरुड : प्रतिनिधी

राजपुरी येथील जावेद अब्बास अमृतखानी यांच्या माझेरी येथील गोठ्यात म्हशी व वासरू चोरून नेल्याप्रकरणी तीन आरोपीना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. माझेरी येथील गोठ्यात बांधून ठेवलेल्या तीन म्हशी, एक पारडे व दोन वासरू अशी एकूण एक लाख 79 हजार रुपये किमतीची जनावरे रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी टाटा कंपनीच्या टेम्पो (एमएच-03,सीपी-4624) मधून चोरून नेल्याची तक्रार जावेद अब्बास अमृतखानी (रा. राजपुरी) यांनी मुरुड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सहाय्य्क पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ, स्वप्नील जाधव, हवालदार रुपेश पालकर, कॉन्स्टेबल बांधनकर यांच्या पथकाने शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने टेम्पोचा शोध घेतला आणि फैजान मोहंमद कुरेशी, सैयद अल्ताफ अली (रा. गोवंडी, मुंबई), व विहूर येथील एका स्थानिकाला ताब्यात घेतले. त्यांना मुुरुड न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या गुन्ह्यांमध्ये पनवेल येथील आरोपीचा सहभाग असून, मुरूड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पेणमध्ये महिलेचे दागिने खेचून दुचाकीस्वार पसार

पेण : प्रतिनिधी

शहरातील म्हाडा कॉलनीत हळदी कुंकू कार्यक्रम आटोपून घरी परतणार्‍या महिलेच्या गळ्यातील सव्वालाखाचे दागिने दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांनी खेचून नेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी महिला 15 जानेवारी रोजी संध्याकाळी 06.40 वा. सुमारास महिला फिर्यादी महिला आपल्या मैत्रीणी सोबत हळदी कुंकू कार्यक्रमाकरीता म्हाडा कॉलनी थिम पार्कसमोर गेली होती. तेथून घरी परत येत असताना श्री. बागडे यांच्या अर्धवट बांधकाम केलेल्या घरासमोर पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या इसमाने त्यांच्या गळयातील एक लाख 25हजार रुपये किमतीचे  सोन्याचे मंगळसूत्र व चैन खेचून नेले. याबाबत पेण पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक कदम करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply