Saturday , June 3 2023
Breaking News

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मारहाण; तरुणीची आत्महत्या

औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रेमप्रकरणाच्या संशयातून मुलाच्या नातेवाईकांनी 16 वर्षीय मुलीला मारहाण केली. बेदम मारहाण आणि संशय सहन न झाल्यामुळे मुलीने विष प्राषन करून आत्महत्या केली. दिव्या प्रभू गव्हाणे असे मृत मुलीची नाव असून, ती सोयगावजवळील बनोटी(वाडी) येथे राहते. आत्महत्या केलेली मुलगी दहावीची परीक्षा देत होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. कैलास छोटू सोनवणे याच्यासह रंजनाबाई गोटू सोनवणे, जागृतीबाई गोटू सोनवणे, सरलाबाई छोटू सोनवणे, आशाबाई बापू सूर्यवंशी(सर्व रा.वाडी, बनोटी) यांनी मुलीच्या घरी कोणी नसताना घरात प्रवेश केला. कैलाससोबत तुझे प्रेमप्रकरण असल्याचा जाब विचारत सर्वांनी तिला बेदम मारहाण केली. प्रेमप्रकरणाचा संशय आणि मारहाण असह्य झाल्याने दिव्याने विषारी द्रव्य प्राशन केले. यानंतर तिला बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला जळगावच्या सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply