Friday , September 29 2023
Breaking News

खोपोलीत नरबळी?

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

खोपोलीतील पटेल नगर भागात एका चार वर्षांच्या चिमुरडीचे मुंडके व धड वेगवेगळे सापडल्याने एकच खळबळ उडाली असून, हा नरबळी असल्याची चर्चा परिसरात आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेजारीच राहणार्‍या एकाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.

खोपोली शिळफाटा येथील पटेल नगरमध्ये ट्रॅक्टरचालक म्हणून काम करणार्‍या अमरसिंह यांची आशा ही चार वर्षांची मुलगी मंगळवार सकाळपासून बेपत्ता होती. बुधवारी (दि. 13) सकाळी पटेल नगरच्या पाठीमागे जुन्या वीजवितरण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या झाडीत मुंडके छाटलेले प्रेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुंजाळ, उपविभागीय अधिकारी रणजित पाटील, खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेगाजे व पथकाने घटनास्थळी जाऊन प्रेत ताब्यात घेतले. आशाच्या पालकांना हे शव ओळखण्यास सांगितले असता, ही आपलीच मुलगी असल्याचे त्यांनी सांगितले. या लहान मुलीचे मुंडके व शरीर 20 फुटांवर पडल्याचे व शरीरावर सळईने मारल्याच्या व लोखंडी सळईने चटके दिल्याच्या खुणा आढळल्या. त्यामुळे चिमुरडीचा अघोरी विद्येकरिता वापर केलाय की बलात्कार करून पुरावा नष्ट करण्याचा तर प्रकार नाही ना याचा तपास पोलीस यत्रंणा करीत आहे. घटनेचे गांभीर्य पाहता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडची टीम घटनास्थळी दाखल झाली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. याप्रकरणी शेजारीच राहणार्‍या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा उलगडा करून आरोपीला गजाआड करू, असे पोलिसांनी सांगितले. मृत दुर्दैवी मुलीची आई मुकी व बहिरी असून वडील ट्रॅक्टरचालकाचे काम करतात; तर त्यांना दोन मुली व एक लहान मुलगा असून, आशा ही सर्वात मोठी मुलगी होती.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply