1984 साली उरण तालुक्यात झालेल्या शेतकरी लढ्यातील पाच हुतात्म्यांचा 36वा स्मृतिदिनानिमित्त चिर्ले येथील हुतात्मा नामदे्व शंकर घरत स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय पुरूष व महिला गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झाला. सोबत कामगार नेते जितेंद्र पाटील, निखिल घरत, समाधान माळी, संतोष मढवी, सुधाकर मढवी, नंदेश घरत.