Sunday , February 5 2023
Breaking News

स्व. लक्ष्मणशेठ पाटील यांची आज सर्वपक्षीय शोकसभा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील (म्हात्रे) आणि त्यांचे पुत्र भाजप कार्यकर्ते अविनाश (नावडे, ता. पनवेल) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पनवेल भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 19) सायंकाळी 4 वाजता आगरी समाज मंडळाच्या पनवेल शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
नावड्याचे लक्ष्मणशेठ पाटील (म्हात्रे) हे पनवेल तालुक्यातील बडे प्रस्थ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते होते. प्रेमळ, मनमिळावू, मितभाषी आणि हसतमुख स्वभावाचे लक्ष्मणशेठ यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. तत्पूर्वी त्यांची पत्नी जनाबाई यांचे, तर त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र अविनाश यांचेही निधन झाले. या तिहेरी आघातामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर एकापाठोपाठ एक दुःखाचे डोंगर कोसळले. काही दिवसांच्या अंतराने आई, वडील आणि मुलगा यांचे निधन झाल्याने नावड्यासह पनवेल तालुका हळहळला.
स्व. लक्ष्मणशेठ पाटील (म्हात्रे) आणि त्यांचे पुत्र स्व. अविनाश यांना आदरांजली वाहण्यासाठी पनवेल तालुका भाजपच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली असून, या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply