Breaking News

जेएनपीटीकडून अधिकृत वेबसाईटची नवीन आवृत्ती लॉन्च

उरण ः रामप्रहर वृत्त

देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटमध्ये अधिक सुलभरीत्या हाताळणी करता यावी यासाठी वाचनीय दर्शनी भाग, दैनंदिन तक्ते व माहिती, सुयोग्य व अचूक माहितीसह विविध कक्ष आणि सर्व पानांची सुलभ माहिती यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात आली आहे. या नवीन वेबसाईटमुळे (ुुु.क्षपिेीीं.र्सेीं.ळप) वापरकर्त्यांना बंदराविषयी कुठलीही माहिती विनाअडथळा सहज सुलभ उपलब्ध होणार आहे. या वेळी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, सध्याच्या गतिशील व्यापारी बाजारपेठेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार करीत असताना वेबसाईट खूप महत्त्वाचा रोल पार पाडत असते. कारण ग्राहक बर्‍याचदा सर्वात आधी वेबसाईटला भेट देऊन त्या ब्रँडविषयी आपले मत बनवीत असतो. तेव्हा वेबसाईटसुद्धा ब्रॅण्डप्रमाणेच ग्राहकांना आकर्षित करून घेणे महत्त्वाचे आहे, तसेच सर्व भागधारकांना वेबसाईट म्हणजे वाचनालयाप्रमाणे असायला पाहिजे. जेणेकरून त्यांना कुठलीही माहिती योग्य, सहज व सुलभ उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळेच आम्ही वेबसाईटमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत ज्यामुळे जेएनपीटीचा आतापर्यंत झालेला एकूण कायापालट दिसून येईल. नवीन पोर्टल व्यापाराशी संबंधित दैनिक व्यवहारासाठी, पोर्टचे मुख्य ठळक मुद्दे आणि इतर पोर्ट संबंधित दुय्यम माहितीसाठी स्पष्ट विभाजित विभागांसह एक मुख्यपृष्ठ प्रदर्शित करते, तसेच इतर मेन्यू बारमध्ये पोर्ट सेवा, प्रकल्प आणि कार्यप्रदर्शन अहवाल, संवर्धन आणि सीएसआरसारख्या इतर प्रमुख उपक्रमांचा ठळक अक्षरात समावेश आहे. आयात निर्यात समुदायाला सहजरीत्या समजून येईल अशा सोप्या साच्यामध्ये दैनंदिन चार्ट व माहिती देण्यात आलेली आहे. एकूणच ही वेबसाईट सुटसुटीत व हाताळण्यास अधिक सोपी करण्यात आली असून मोबाईलवरही उपलब्ध असल्याने प्रवासात कुठेही पाहता येऊ शकणार आहे. समुद्री क्षेत्रासाठी गौरवपूर्ण सेवेची 30 वर्षे जेएनपीटी साजरी करीत असून बंदराच्या पुढील परिवर्तनासाठी नवनवीन उपक्रम अंमलात आणीत आहे. नवीन वेबसाईट जेएनपीटीच्या या नवीन टप्प्याला देखील प्रतिबिंबित करीत असून पुढील दशकात परिचालन उत्कृष्टतेच्या आधारे जागतिक सर्वोत्कृष्ट बंदरात येण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply