Wednesday , February 8 2023
Breaking News

नागोठण्यात नेत्रचिकित्सा शिबिरास प्रतिसाद

नागोठणे : प्रतिनिधी

शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 17) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर चालणार्‍या वाहनांच्या चालकांसाठी नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी 25 वाहनचालकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. नागोठणे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, नेत्रचिकित्सा अधिकारी जे. जे. शेख, ज्येष्ठ अधिकारी यशवंत कर्जेकर, वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक फौजदार महादेव मोकल, अशोक घोलप, प्रियदर्शनी सहकारी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टके, असगर सय्यद, शेखर गोळे, अजय साळुंखे आदींसह कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply