Breaking News

राज्यस्तरीय महिला दिनात डॉ. शुभदा नील यांचे व्याख्यान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेतर्फे ठाणे येथे विठ्ठल सायन्ना सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात कर्करोग तपासणी मोहीम आणि शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात वेलनेस ऑफ वूमन-एक पाऊल कॅन्सरमुक्तीसाठी फोग्सी व ब्रह्माकुमारीज उपक्रमाच्या राष्ट्रीय संयोजिका डॉ. शुभदा नील यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली व उपक्रमाबद्दल माहिती दिली, तसेच डॉ. शुभदा यांनी महिलांच्या कर्करोगाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी तिहेरी जीवनशैलीचे महत्त्व प्रेझेंटेशनद्वारे विषद केले. त्यामध्ये आहार, व्यायाम व ध्यान याला प्राधान्य दिले. तसेच सर्वांना सकारात्मक चिंतन करण्याचे सुचवले. त्यानंतर ‘वंदे मातरम्’ या गीतावर डॉ. शुभदा नील यांनी योगाची प्रात्यक्षिके करवून घेतली.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply