
पनवेल ः बातमीदार
पोलीस दलातील नोकरी व कुटुंब यांची यशस्वीपणे सांगड घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव झटणार्या पोलीस महिला कर्मचार्यांसाठी नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्यविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पोलीस सहआयुक्त डॉ. सुरेश मेकाला, पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, तुषार दोषी, पंकज डहाणे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल शेंडणे यांनी महिला पोलीस कर्मचार्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कामाची स्तुती केली. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मधुमेहतज्ज्ञ डॉ. स्नेहा निकटे यांनी सकस आहाराबाबत योग्य मार्गदर्शन केले. तसेच बसल्या जागी व्यायामाचे प्रकार समजावून सांगितले. या कार्यशाळेत वाहतूक नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलीस स्थानकातील चारशेहून अधिक महिला पोलीस कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.