Tuesday , February 7 2023

सुरेश भातडे ‘ज्युनियर रायगड श्री 2020’

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन सलग्न शेळके जीमच्या वतीने आई गावदेवी चषक जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुरेश भातडे याने ज्युनियर रायगड श्री 2020 हा किताब पटकाविला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले.

आशियाई संघटनेचे सचिव डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलजवळील आदई गाव येथे झालेल्या या स्पर्धेस शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू व प्रशिक्षक मारुती आडकर यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे जि. प. सदस्य अमित जाधव, युवा कार्यकर्ते शेखर शेळके, विचुंबेचे उपसरपंच रवींद्र भोईर, आदईचे माजी सरपंच रूपेश पाटील, माजी उपसरपंच विलास शेळके, निमंत्रक दिपेश शेळके व दिनेश शेळके आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत 150हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. त्यांच्यात चुरस दिसून आली. अखेर ज्युनियर मेन फिजिक रायगड किताब ऋषिकेश पेणकर याने, मास्टर रायगड श्री सुनील भोईर, तर दिव्यांग रायगड श्री हा बहुमान महेंद्र वायले याने प्राप्त केला. विजेत्यांना पदक, चषक व आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले, तसेच सहभाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांना चषक देण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्पर्धकांची निवड ज्युनियर महाराष्ट्र श्री या स्पर्धेसाठी करण्यात आली. ही स्पर्धा 26 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे होणार आहे.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply