Breaking News

भारतीय संघ न्यूझीलंडच्या जम्बो दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नववर्षात श्रीलंकेनंतर बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमविणारा भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यासाठी रवाना झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा यंदाच्या वर्षातील हा पहिलाच परदेश दौरा आहे.

भारताच्या न्यूझीलंड दौर्‍याला 24 जानेवारीपासून सुरुवात होणार असून, उभय संघांत पाच ट्वेन्टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. गतवर्षी भारताने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय मालिकेत 4-1 असे पराभूत केले, तर ट्वेन्टी-20 मालिकेत मात्र यजमानांनी भारताला 2-1 असे नमवले होते.

धवन संघाबाहेर न्यूझीलंड दौर्‍याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन न्यूझीलंड दौर्‍याला मुकण्याची शक्यता आहे; कारण न्यूझीलंडला जाणार्‍या खेळाडूंच्या यादीतून धवनला वगळण्यात आले आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply