Breaking News

हर घर तिरंगा अभियानांतर्गत पेणमध्ये जनजागृती रॅली

पेण : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या ’हर घर तिरंगा’अभियानाविषयी  जनजागृती करण्यासाठी पेणमध्ये रॅली काढण्यात आली होत. या जनजागृती रॅलीमध्ये पेणमधील प्रायव्हेट हायस्कूल, सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, नगर परिषद उर्दू शाळा, पेण एज्युकेशन प्राथमिक शाळा यांच्यासह विविध कॉलेज व शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होेते. पेण शहरातील महावीर मार्ग, गांधी मंदिर रस्ता, पेण नाका, राजू पोटे मार्ग, चिंचपाडा रोड आदी परिसरातून  ढोल, ताशांच्या गजरात फिरविण्यात आलेल्या या रॅलीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.  सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलजेच्या रॅलीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पेणचे नायब तहसीलदार रमाकांत कालेकर, माजी सैनिक सुरेंद्र ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या वेळी पेण नाक्यावरील साई मिठाई या दुकानाच्या मालकाने रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पेढे वाटप केले. सर्व रॅलींची सांगता आपापल्या विद्यालयात करण्यात आली.

Check Also

विकासकामे भाजपच करू शकतो -अरुणशेठ भगत

केळवणे येथे विकासकामांचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त शेकापने विकासाच्या कामांना विरोध करण्याचे काम नेहमीच …

Leave a Reply