Sunday , February 5 2023
Breaking News

‘अनुभूती’मध्ये सीकेटी महाविद्यालयाचे घवघवीत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा आयोजित ‘अनुभुती’ 2019-20 आंतरमहाविद्यालियन सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध स्पर्धांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त दर्जा प्राप्त)च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. 21 जानेवारी रोजी झालेल्या एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी घवघवीत यश मिळवले आहे. या कार्यक्रमात पथनाट्य, समुहनृत्य फोटो वॉक, पोस्टर मेकिंग, मुवी रिव्हयु, ओपनमिक, रांगोळी या विविध स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठ सल्लगित 32 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. अनुभुती हा कार्यक्रम मानसिक आरोग्य आणि जनजागृती या वरती आधारीत होता. महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी समुहनृत्य या प्रकारात स्पर्धचे व्दितिय पारितोषिक मिळवले, या मध्ये आरती भगत, त्रृचा शेरंमकर, ऋतुजा शेरंमकर, मनीष देशमुख, नमीता शिंदे, मधुरा कदम, हर्षला राने, तनिष्का भोसले, यांनी सर्कीय सहभाग घेतला होता. यात त्यांनी वडिलांचे आयुष्यातले महत्व हा विषय सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. पोस्टर मेंकिगमध्ये रिया कर्ण हीने प्रथम पारितोषिक मिळवले तसेच मनीष देशमुख या स्वयंसेवकाला उत्कृष्ट गट प्रमुख म्हणून गौरविण्यात आले. त्याचबरोबर पथनाटय या प्रकारात भाग घेतलेले शुंभम डफळ, अभिषेक पाटील, वर्षा खोत, गायत्री गुंजावळे, नितेश मानकामे, रुपेश माने, शुंभम विश्वकर्मा, आदिती वाघमारे, कृपा रुपारेल, डेबोराह सुब्रमण्यंम यांचा पथनाटयाला सुदधा उपस्थितांनी दाद दिली. पोस्टर मेंकिगमध्ये रिया कर्ण, निशादेशी चौधरी, सुप्रिया कदम, तसेच रांगोळी स्पधेत सुनिता सांगळे व मुवी रिव्हु, मध्ये वर्षा खोत गायत्री गुंजावळे व कोमल थोरात यांनी सहभाग नोंदविला. ओपन मिकमध्ये पौणिमा गायकवाड, निशा कदम, प्रणाली जाधव यांनी दमदार सादरीकरण केले. अशा या घवघवीत यशाने स्वंयसेवकांनी सीकेटी महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभागात असणारी यशस्वी घौडदौड मुंबई विद्यापीठ सल्लंगनित महाविद्यालयांमध्ये कायम ठेवली. या संपूर्ण घौडदौडीत महाविद्यालयाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सुर्यकांत परकाळे, प्रा. अपुर्वा ढगे, प्रा. भाग्यश्री भगत तसेच इतर कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले. या उल्लेखनिय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी सर्व विजेत्या स्वंयसेवकांचे कौतुक करुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply