अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. महानगर गॅस कंपनीच्या सीएसआर फंडातून आई फाउंडेशनच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक सुशांत राऊत, रायगड जिल्हा अपंग संस्थेचे अध्यक्ष साईनाथ पवार, आई फाउंडेशनचे राजू साळुंखे, महानगर गॅसच्या सहाय्यक व्यवस्थापक सीएसआर प्रियांका दळवी, अपंग क्रांती आघाडीचे बी. जी. पाटील, शिवाजी पाटील, शैलेश सोंडकर, संतोष माने, मेहबुब शेख आदी उपस्थित होते. यापुढेही दिव्यांगांना मदत करण्याचा मानस महानगर गॅसच्या वतीने व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित लाभार्थी दिव्यांगांच्या चेहर्यावर आनंद पहायला मिळत होता. दरम्यान, आई फाउंडेशन आणि साईनाथ पवार यांनी लोकांना एकत्र आणण्याची जी किमया साधली ती उल्लेखनीय असल्याचे सांगण्यात आले.