Sunday , September 24 2023

वलपमधील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन अनेक जण या पक्षात प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे भाजपची विकासकामे पाहून शेकापच्या कार्यकर्त्यांनी रविवारी

(दि. 10) पक्षप्रवेश केला. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

पनवेल मालधक्का येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, वृषाली वाघमारे, वलपमधील भाजप कार्यकर्ते योगेश तांडेल, दीपक उलवेकर, बुधाजी मोरावकर, कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, संदीप तांडेल, प्रमोद भोपी, शिवदास पवार, अशोक उलवेकर आदी उपस्थित होते.

या वेळी वलप येथील शेकापचे ह.भ.प. हरिदास टेंभे, ह.भ.प. भरत पाटील, हरिश्चंद्र खारेकर, अंकुश पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल मनपाच्या बैठकीत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात …

Leave a Reply