Breaking News

पनवेलमध्ये रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या दहा -पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. वेगवेगळ्या ठिकाणहून पनवेल आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये लोक नव्याने राहायला आली आहेत, परंतु ते काम धंद्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी जात असतात त्यांना आपल्या घरापासून कामधंदाच्या ठिकाणापर्यंत सुरक्षितपणे आपण सारी मंडळी दररोज पोचवत असता. हे सगळे करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना दररोज सामोरे जावे लागत असतं आणि अशा समस्या सोडवण्यासाठी व्यासपीठावर बसलेली सारी मंडळी आणि मी आमदार प्रशांत ठाकूर म्हणून आपल्या पाठीशी नेहमी उभा राहीन, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मेळाव्या दरम्यान केले.
या मेळाव्याला भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री तथा माजी आमदार दयानंद सोपटे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर,उत्तर रायगड भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, भारतीय मजूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, अजय बहिरा, रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष सुनील घरत, राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाचे सचिव संजय भगत, अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी नगराध्यक्ष मदन कोळी, कोकण विभागीय कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष शैलेश पाटील, वंदे मातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, वंदे मातरम रिक्षा संघटनेचे सरचिटणीस मोतीलाल कोळी, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव रवींद्र कोरडे यांच्यासह या मेळाव्याला रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी या मेळाव्याच आयोजन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी ही आपली मनोगत व्यक्त केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply