Breaking News

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार आमदार महेश बालदी मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करत विजयाचा शंखनाद करणार आहेत.
विकासाला प्राधान्य देणारे आमदार महेश बालदी मताधिक्य मिळवून विजयी होण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज झाले आहेत. मंगळवारी सकाळी 9 वाजता उरण जासई येथील शिव समर्थ स्मारक दास्तान फाटा येथील सभागृहात महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत.
आपल्या कार्यकौशल्यातून उरणमध्ये विकासाची गंगा आणणारे तसेच कर्तव्यदक्ष व नेतृत्त्व गुणसंपन्न नेते आमदार महेश बालदी हे नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना जनतेचा कौल मिळणार असून मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply