पनवेल : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास अपेक्षित आहे. त्यांच्या सबका साथ, सबका विकास, या ध्येय धोरणाप्रमाणे पनवेल तालुक्यातील उमरोलीकरांची अनेक वर्षांची मागणी असलेल्या पुलाचे रविवारी (दि. 10) सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
पनवेल-माथेरान रस्त्यावर असलेल्या उमरोली गावात जाण्याच्या मार्गावरील पुलाच्या कामाचा शुभारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमास नगरसेवक संतोष शेट्टी, सरपंच सुखदा माळी, नारायण माळी, नारायण मढवी, आशा माळी, पंचायत समिती सदस्य तथा भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष भूपेंद्र पाटील, राज पाटील, तसेच राम मढवी, आनंद ठाकूर, राम माळी, सचिन पाटील माणगाव तालुक्यातील भाजपचे रायगड जिल्हा विधी संयोजक अॅड. परेश जाधव, कामगार आघाडी अध्यक्षा शर्मिला सत्वे, किसान शेलार, धनंजय ढवळे, नाडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
पनवेल तालुक्यातील उमरोली येथे जाण्याच्या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेक वेळा गावात जाण्याचा मार्ग दोन-तीन दिवस बंद राहत होता. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी होती. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत आता हा दीड कोटी रुपये खर्चाचा पूल बांधण्यात येणार असून, त्याचे टेंडर मे. विशाल एंटरप्रायजेस यांनी घेतले आहे. यानिमित्ताने येथील जनतेची मागणी पूर्ण केल्याबद्दल स्थानिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद दिले.
एकाच कामासाठी दीड कोटी आमदार निधी देण्यास अधिकारी विरोध करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्याने अखेर या कामाला निधी उपलब्ध झाला. या पुलामुळे उमरोली गावातील आणि या भागात नवीन होणार्या वसाहतीतील नागरिकांची अडचण दूर होणार आहे.
– आमदार प्रशांत ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष