उरण : रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उरण मतदारसंघात शेकापला खिंडार पडले आहे. शेकापचे उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांनी पक्षाला राम राम करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले.
आमदार महेश बालदी यांच्या दृरदृष्टीतून होणार्या विकासकामांवर आणि सक्षम नेतृत्वावर आकर्षित होऊन शेकापचे मेघनाथ तांडेल यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने उरणमध्ये शेकापला जबर धक्का बसला आहे, तर भाजप अधिक मजबूत झालाय. या वेळी आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी सरपंच योगेश पाटील, भार्गव पाटील, राकेश म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …