पनवेल : रामप्रहर वृत्त
विविध लेख, कथा यांची सांगड घालून तयार केलेला ‘रामप्रहर’चा दिवाळी अंक सर्वांसाठी वाचनीय असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि.28) केले. या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर उपस्थितीत होते.
रायगड, नवी मुंबईत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘रामप्रहर’च्या टीमने कॅलिडोस्कोप या शीर्षकाखाली दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘राम प्रहर’चे कर्मचारी आणि वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रकाशन समारंभास ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, उपसंपादक तन्वी गायकवाड-पवार, सायली रावले-वैद्य, मुख्य आर्टिस्ट अरुण चवरकर, आर्टिस्ट शशिकांत बारसिंग, लेखापाल उद्धव घरत आदी उपस्थित होते.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …