पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल शहरातील प्रभाग 19मधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी युवा निर्धार मेळाव्याचे औचित्य साधून भाजपत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षात स्वागत केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. पनवेलमध्ये केलेली आणि होत असलेली विकासकामे पाहून तरुणाई आकर्षित होत आहे. अशाच प्रकारे शिवसेना ठाकरे गटाचे राजेंद्र भगत यांनी मनीष शृंगारपुरे, राजू ठाकूर, जयदीप भगत, प्रशांत बगेरा, मंदार भगत, मंगेश भगत, संदीप भोपी, अनंता म्हात्रे, चेतन सावंत, निखिल गायकर, सुबोध म्हात्रे या तरुणांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे शहर मंडल उपाध्यक्ष केदार भगत यांच्या प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे युवाशक्ती आणखी वाढली आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …