Breaking News

किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; मुंबई उपनगर, ठाणे विजेते

अहमदनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या 31व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगरने सलग दुसर्‍यांदा किशोरी, तर ठाण्याने प्रथमच किशोर गटाचे जेतेपद पटकाविले. अहमदनगर येथील रेसिडेन्शियल हायस्कूलच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगली.

किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने परभणीचा 57-27 असा लीलया पराभव करीत स्व. राजश्री चंदन पांडे फिरता चषक दुसर्‍या वर्षी आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. किशोर गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याने पुण्याचा प्रतिकार 42-19 परतवून लावत स्व. नारायण नागो पाटील फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. 31 वर्षांच्या किशोर-किशोरी गटाच्या निवड चाचणी कबड्डीच्या इतिहासात ठाण्याने प्रथमच ही किमया साधली. यंदा उपविजेतेपदाचे रूपांतर विजेतेपदात करण्यात त्यांना यश आले. हा सामनाही एकतर्फी झाला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply