Sunday , February 5 2023
Breaking News

पेणच्या कुस्ती आखाड्यात पुण्याचा संदीप काळे विजेता

पेण : प्रतिनिधी

पेण तालुका कुस्तीगीर विकास संघातर्फे सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनी आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात पुण्यातील हनुमान आखाड्याचा संदीप काळे याने पुण्याचाच भरत लोकरे याला चीतपट केले. यासह संदीपने मानाची गदा व रोख 15 हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले.

स्पर्धेचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने व बांधकाम व्यावसायिक सचिन शिगवण यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, माजी नगरसेवक समीर म्हात्रे, अनवर खान, मारुती साळुंके, अमित कुंभार आदी उपस्थित होते. स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, पनवेल, कर्जत अलिबाग, रोहा, सातारा, सांगली येथील नामवंत पहेलवान सहभागी झाले होते.

विजेत्यांना प्रमुख पाहुणे राजू पिचिका, नरेश गावंड, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण, उपाध्यक्ष सुधाकर पोटे, कार्याध्यक्ष सुनील सत्वे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या वेळी जगनशेठ म्हात्रे, नगरसेवक संतोष पाटील, धर्मेश पोटे, प्रकाश झावरे, अमित कुंभार, संजय म्हात्रे आदींसह क्रीडारसिक उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply