Breaking News

अंकिता मयेकर यांना पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

अलिबाग : प्रतिनिधी

रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या भंडारी श्री पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी सुवर्णपदक पटकावले. 52 किलो वजनी गटात 255 किलो वजन उचलून त्यांनी ही कामगिरी केली. मागील वर्षी शासनाने अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू म्हणून मयेकर यांना वर्ग 2 म्हणून सेवेत घेतले. सध्या त्या पेण तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असून, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम पहात आहेत. राज नेवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सराव सुरू आहे, तर जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे सचिव मदन भास्करे, घवाली, लीना घाडीगावकर, सदानंद जोशी, शैलेश जाधव त्यांचे मार्गदर्शक आहेत. शासकीय सेवेत असूनसुद्धा मयेकर यांनी खेळाची आवड जपली आहे. यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply