Wednesday , February 8 2023
Breaking News

कुलाबा किल्ल्यात माघी गणेशोत्सव उत्साहात

अलिबाग ़: प्रतिनिधी

येथील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणेश मंदिरात मंगळवारी (दि. 28) खास माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे काकड आरतीने या उत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी ओहोटीची वेळ साधत भाविकांनी गणेश पंचायतनाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने किल्ल्यात ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. संपूर्ण किल्ल्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माघी गणेशोत्सवानिमित्त कुलाबा किल्ल्यातील सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी पहाटेपासून भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या होता. रात्री उशिरापर्यंत भक्तांची गर्दी कायम होती. त्यामुळे किल्ला परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply