Breaking News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात निवडणूक कक्ष

पनवेल : वार्ताहर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या अनुषंगाने परिमंडळ 1 व परिमंडळ 2 अंतर्गत येणार्‍या सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशाने निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. परिमंडळ 1 व परिमंडळ 2 अंतर्गत असलेल्या पनवेल विधानसभा, उरण विधानसभा, बेलापूर विधानसभा व ऐरोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाच्या आदेशाने व नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणूक कक्षामध्ये वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसह सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक व पोलीस हवालदार आदी अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून निवडणुकीत उभ्या राहणार्‍या उमेदवारांना प्रचारासाठी परवानगी देणे, सभा, रॅली तसेच निवडणुकीसंबंधित इतर कामे या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. यासाठी सदर निवडणूक कक्षात समाविष्ट करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांची नावे व मोबाईल नंबर संबंधित उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात येणार आहेत, त्यामुळे संपर्क साधणे सोईस्कर होऊन वेळेची बचत होणार आहे. 

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply