Breaking News

स्मृतीची टी-20मध्ये तिसर्या स्थानी झेप

दुबई : वृत्तसंस्था

भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला ट्वेन्टी-20 क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेत कारकिर्दीत सर्वोत्तम तिसरे स्थान पटकाविले आहे.

हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व मानधनाने केले. तीन सामन्यांत तिने 72 धावा केल्या. तिसर्‍या सामन्यात अर्धशतकही ठोकले होते. दुखापतीमुळे मालिकेत खेळू न शकलेल्या हरमनप्रीतचे दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. गोलंदाजांमध्ये राधा यादव हिने पाच स्थानांनी आघाडी घेतली. ती पाचव्या स्थानावर आली. तिने दोन सामन्यांत तीन गडी बाद केले. फिरकी गोलंदाज एकता बिष्ट 56व्या स्थानावर आहे.

इंग्लंडच्या डॅनियल वॅटनेही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावताना 17व्या स्थानावर कब्जा केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत तिने 123 धावा फटकावत इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. सांघिक क्रमवारीमध्ये इंग्लंड पहिल्या; तर न्यूझीलंड दुसर्‍या स्थानावर आहे.

Check Also

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरपीएल ट्रॉफीचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने आयोजित करण्यात येणार्‍या आरपीएल अर्थात …

Leave a Reply