Breaking News

मृणाल दुसानिसकडून विद्यार्थ्यांचा गौरव

नवी मुंबई : बातमीदार

पुणे विद्यार्थी गृह विद्याभवन पूर्व-प्राथमिक मराठी व इंग्रजी विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संचालक दिनेश मिसाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्या अभिनेत्री मृणाल दुसानिस यांनी विद्यार्थ्यांशी आपल्या शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला, त्या म्हणाल्या की, मी ही शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. या विद्यार्थीदशेत कार्यक्रमात भाग घेतल्याचा फायदा अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवताना झाल्याचे मृणाल म्हणाल्या. सर्व विद्यार्थ्यांना मृणाल यांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष  राजेंद्र बोर्‍हाडे, माजी कार्याध्यक्ष व संचालक प्राचार्य कृ. ना. शिरकांडे, ज्येष्ठ संचालक डॉ. शं. पां. किंजवडेकर, घाटकोपर विद्याभवन नं. 2 चे मुख्याध्यापक पांडुरंग मुळिक, ऐरोली माध्यमिक विद्यालयाचे सेक्रेटरी तुकाराम नांदुगडे, संचालक यादव विद्याभवन प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा मिसा, माध्यमिक इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रिजा नायर माध्यमिक मराठीचे मुख्याध्यापक शिवाजी माळी, प्राथमिक इंग्रजीच्या मुख्याध्यापिका मनिषा मुळीक, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त रंगनाथ निचित, सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रीती दाभाडे यांनी केले. आभार वर्षाराणी पिसे यांनी मानले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply