Wednesday , June 7 2023
Breaking News

हजेरी मास्टरवर उपनिरीक्षकाचा हल्ला

अलिबाग : प्रतिनिधी

ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी स्पष्ट केले आहे. मंगेश निगडे यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात जबाब लिहून दिला आहे, मात्र अद्यापही याबाबत कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नाही.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply