Breaking News

कैरे शाळेत रंगले स्नेहसंम्मेलन

मोहोपाडा : प्रतिनिधी

कैरे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झालेे. या कार्यक्रमात मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने  शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती  अध्यक्ष  वंसत पाटील व सर्व सदस्य यांचे मदतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात वर्षभर शाळेत होणारे उपक्रमाचे चित्रिकरण प्रोजेक्टरद्वारे सर्वांना दाखवण्यात आले. याचे सर्व नियोजन संदिप पाटील व केशव म्हात्रे या शिक्षकांनी केले. लहान मुलांचे देखण्याजोगे न्रुत्य, नाटीका, देशभक्तिपर गिते असे एकूण अठरा कार्यक्रम आयोजित करुन यामध्ये 50 मुलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या पद्मा सुरेश पाटील  ग्रामपंचायत सदस्य  उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक सुध्दा हा कार्यक्रम पहाण्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदादीप चोपडे व अर्चना म्हात्रे या शिक्षकांनी केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply