Breaking News

यंग सोशल इनोव्हेटर पुरस्कार सोहळा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने यंग सोशल इनोव्हेटर पुरस्कार सोहळ्याचे रविवारी (दि. 2) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल यांच्यावतीने पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यास अच्युत गोडबोले यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी विविध नामवंताना गौरवण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष विक्रम धुमाळ, सचिव श्रीपाद वैशंपायन, युथ डायरेक्टर योगिता देशमुख, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अनुपम सिंघ आदी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply