Breaking News

उसर्ली येथे लाभार्थी संवाद आणि उद्घाटन सोहळा

नागरिकांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उसर्लीकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्यांना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध राहू, असे आश्वासन पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाभार्थी संवाद आणि उद्घाटन सोहळ्यावेळी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देशभरत करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर पनवेल तालुक्यातील उसर्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यत्त पोहचवण्यसाठी लाभार्थी संवाद तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून करण्यात आलेल्या उसर्ली खुर्दमधील वॉर्ड क्रमांक 164 या ठिकाणी रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 17) करण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी नागरिकांसोबत संवाद साधला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून नऊ लाख 99 हजार रुपयांचा निधी वापरून या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, उसर्ली खुर्द माजी सरपंच अतुल तांबे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, भाजपचे उसर्ली अध्यक्ष मच्छींद्र पाटील, सदस्य अमित भगत, संजय भगत, जयवंत भगत, विजय भगत, रामचंद्र भगत, शंकर भगत, विनायक भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाची ताकद नागरिकांच्या उपयोगी आली पाहिजे. त्यामुळे नागरिकांच्या सर्व सोयीसुविधा आणि त्यांच्या ससम्या सोडवणे भाजपचे कर्तव्य आहे आणि अम्ही ते कर्तव्य पूर्णपणे बजावणार, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचा धडाका सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Leave a Reply