Breaking News

माथेरानमधील दोन दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवित हानी नाही, नागरिकांमुळे आग आटोक्यात

कर्जत : बातमीदार

माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटरमधील रोहित टी अ‍ॅण्ड कोल्ड्रिंक या दुकानाला रविवारी रात्री 1:30 सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली आहेत सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी टळली. अग्निशमन आणि नागरिकांमुळे ही आटोक्यात आणण्यात यश आले.माथेरान येथील हे शॉपिंग सेंटर माथेरान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे पर्यटकांची रेलचेल सतत असते. येथील रोहित कोल्ड्रिंक सेंटर हे काही वर्षांपासून बंद अवस्थेत होते. या दुकानात जुने पुराने साहित्य होते. दुकानाच्या बाहेर शेकोटी पेटवली होती मात्र रात्री ही शेकोटी विझवली नव्हती, त्यामुळे या शेकोटींची ठिणगी दुकानाला लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीच स्वरूप वाढत गेले. आणि बाजूला लागून असलेल्या नाझ कलेक्शन या दुकानाने पेट घेतला तेव्हा समोर असलेल्या हॉटेल व्यवस्थापक बाबूनाथ रावल यांनी ही आग पाहिली व तात्काळ पोलिसांना फोन करून ही माहिती सांगितली, त्यानुसार सहाय्यक फौजदार नारायण बार्शी व पोलीस हवालदार अरविंद ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत अग्निशमन बंब घटनास्थळाकडे रवाना झाला होता. स्थानिक नागरिक सोहेल महापुळे, अमोल सकपाळ, नासिर शारवान, चंद्रकांत जाधव, सुर्यकांत कारंडे, अल्ताफ डांगे, उन्मेश दाभेकर तसेच पोलीस आणि अग्निशमन बंबावर कार्यरत असलेले अजिंक्य सुतार यांनी काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply