पनवेल : रामप्रहर वृत्त
28 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान नागपूर येथे झालेल्या ‘ऑल इंडिया फोर्थ नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अॅण्ड फीस्ट’ मध्येे सीकेटीच्या विद्यार्थीनींनी चांगलेच सुयश प्राप्त केले आहे. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाची विद्यार्थीनी सई मयुरेश जोशी हिने प्रथम क्रमांक संपादन केला.
देशभरातील 400 स्पर्धकांचा यात सहभाग होता. तर सीकेटी इंग्रजी माध्यमाच्या सई मयुरेश जोशी, श्रावणी अमर थळे आणि प्रणिता वाघमारे यांचा सहभाग असलेल्या गटाने समुह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा नृत्य कलाकारांसाठी एक आव्हानात्मक स्पर्धा असून या विद्यार्थीनींचा शाळेला अभिमान आहे.े असे या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, संतोष चव्हाण यांनी सांगितले. या यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, संतोष चव्हाण सर, पर्यवेक्षक़, मार्गदर्शक शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.