Breaking News

सोशल मीडियाद्वारे मैत्री वाढवून तरुणीवर अत्याचार

पनवेल ः वार्ताहर
पनवेल भागात राहणार्‍या एका 20 वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवरून 19 वर्षीय तरुणीसोबत मैत्री वाढवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण करून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे तरुणाने पीडितेसोबत लग्न करून तिच्यासोबत पुण्याला राहण्याचे आश्वासन देऊन लग्नानंतर लागणारा खर्च म्हणून तिच्याकडून 71 हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी तरुणाविरोधात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 19 वर्षीय पीडित तरुणी व तरुण दोघेही पनवेलमध्येच राहण्यास असून काही महिन्यांपूर्वी त्याने पीडितेसोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री केली होती, तसेच प्रेमसंबंध निर्माण करून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला नवीन पनवेलमधील लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान त्याने तरुणीसोबत लग्न करून पुण्याला राहण्याचे आश्वासन देऊन लग्नानंतर राहण्या-खाण्यासाठी लागणारा खर्च म्हणून तिच्याकडून 71 हजार रुपये उकळले.
त्यानंतर तरुणाने तिला टाळायला सुरुवात केली व लग्न करण्यासदेखील नकार दिला. अखेर पीडितेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून तो गुन्हा खांदेश्वर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला. त्यानुसार खांदेश्वर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply