उरण : प्रतिनिधी
उरण-बेलापूर रेल्वेची पाहणी करण्यासाठी सिडकोचे व रेल्वेचे अधिकारी जासई येथे आले असता, जासई संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, यशवंत घरत, नरेश घरत तसेच ग्रामस्थांनी पाहणी अधिकार्यांना 12 टक्के विकसित भूखंड तसेच गावाच्या नागरी सुविधा आधी द्या. नंतर तुमचे काम सुरू करा, अशी मागणी केली. या वेळी सिडको विशेष कार्यकारी अभियंता पुजारी, कार्यकारी अभियंता साळवे, उपकार्यकारी अभियंता मांगले तसेच रेल्वेचे अधिकारी विशेष कार्यकारी अभियंता शुभांगी पाटील, सीनियर सेक्शन अधिकारी यादव, कामगारवर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.