Breaking News

भाजपतर्फे लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

खारघर : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाकार्य उपक्रम राबविण्यात आला. याच पार्श्वभूमीवर खारघर येथील तीन कोविड लसीकरण केंद्रांवर येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची (बिसलेरी) व्यवस्था करण्यात आली.

केंद्रावर बिसलेरीचे वाटप करताना भाजप शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यु पाटील, रामजी बेरा, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, पनवेल तालुका अल्पसंख्यक मोर्चाचे मन्सूर पटेल, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विनोद घरत, अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस इर्शाद शेख, काशीनाथ घरत आदी उपस्थित होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply