भाजप नेते अरुणशेठ भगत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल तालुक्यातील वाकडी येथील सर्व महिला मंडळाच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजेचे भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मंगळवारी (दि. 4) दर्शन घेतले. या वेळी विविध धार्मिक भजन, किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
या महापूजेचे आयोजन शिवकन्या महिला बचत गट, जय मल्हार महिला बचत गट, श्री समर्थ महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, श्री सद्गुरु महिला बचत गट, गावदेवी महिला बचत गट, सरस्वती महिला बचत गट, जिजाऊ महिला बचत गट, श्री स्मरण महिला बचत गट, संस्कृती महिला बचत गट, कुलस्वामिनी महिला बचत गट, शंभुराजे महिला बचत गट, विघ्नहर्ता महिला बचत गट, स्वयंम सहाय्यता गावदेवी महिला बचत गट या सर्व बचत गटातील महिला पदाधिकार्यांनी केले होते.
कार्यक्रमाचे व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ वाकडी व आदिवासी वाडी, शांतिवन, ग्रीन एकर्स सोसायटी, वास्तुसिध्दी सोसायटी, स्वराज सोसायटी, हिंदुस्थान नगर, रियल होम, सुर्वे फार्म, वाकडी हे होते.