पनवेल : रेल्वे स्टेशन ते सुकापूर येथील रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी आदी उपस्थित होते. हा रिक्षा स्टॅन्ड वंदे मातरम जनरल कामगार संघटना, रवी नाईक व अॅड. चेतन केणी यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला आहे.