Breaking News

एटीएम फोडणार्‍या चोरास पकडले रंगेहाथ

उरण : वार्ताहर

उरण तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी गांधी चौकाजवळ असणार्‍या बँक ऑफ इंडियाचे एटीम मशीन फोडणार्‍याला पोलिसांकडून रंगेहाथ

पकडण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून असे समजले की, विक्रांत प्रकाश मोकल वय (22 वर्षे) सध्या राहणारा अक्षर बिल्डिंग 4/103, साई मंदिर सेक्टर 15 उलवे नोड नवी मुंबई या आरोपीचे नाव असून मूळ राहणारा, उरण तालुक्यातील घर नं 354 हनुमान मंदिराजवळ रांजनपाडा येथील तो स्थानिक रहिवासी आहे.

गुरुवारी (दि. 6) मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक ग्राईडरच्या साहाय्याने एटीएम मशीनची दोन भाग करून पैसे असणार्‍या पेटी कापत असताना रात्री गस्त घालत असणार्‍या पोलीस शिपाई संतोष जगदाळे, पोलीस नाईक रतन राठोड, पोलीस शिपाई निलेश ठाकूर यांना संशय आला तेथे एटीएम मशीनची तोडफोड होऊन अस्थव्यस्थ पडलेले दिसले. आतील बाजूस एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून हातात ग्राईडर मशीन घेऊन उभा होता त्यामुळे हा प्रकार

उघडकीस आला.

या वेळी विक्रांत मोकल आरोपीस रंगेहाथ पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले, त्यांच्याविरुद्ध उरण पोलीस ठाणे गुरक्र 38/ 2020 भादंवि कलम 380, 454, 511 आणि 427 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार अधिक तपास करत आहेत. आरोपीस गुन्हयात गुरुवारी (दि. 6) अटक केली असून मा. न्यायलय उरण यांनी सोमवार (दि. 10) पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.

पोलीस उपाआयुक्त परिमंडल-2 पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) विठ्ठल दामगुडे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply